अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- कोरोना काळात राज्याच्या महसूलावर परिणाम झाला म्हणून राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊननंतर राज्य सरकारने सर्वात प्रथम दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर दारुच्या दुकानावर मद्यप्रेमींच्या भल्या मोठ्या रांगा बघून महाराष्ट्रात तळीरामांची संख्या सर्वाधिक असेल, असं प्रत्येकाला वाटलं होतं. पण दारु पिण्यात महाराष्ट्राच्या पुढेही दोन राज्ये आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या पहिल्या फेजचा अहवाल जाहीर केला. हे सर्वेक्षण देशातील 22 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं आहे.
या सर्वेक्षणात महाराष्ट्र दारु पिण्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. तेलंगणा आणि कर्नाटक ही दोन राज्ये दारु पिणाऱ्यांच्या संख्येत पुढे आहेत.
तर बिहारमध्ये दारु बंदी असतानाही दारु पिणाऱ्यांच्या प्रमाणात ते राज्य महाराष्ट्राच्याही पुढं असल्याचं दिसून आलं आहे. कर्नाटकमधील पुरुष अट्टल बेवडे या सर्वेक्षणानुसार कर्नाटकमधील पुरुष सर्वाधिक मद्यपान करत असून,
दारू पिण्याच्या बाबत महाराष्ट्रातील पुरुष देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दारुबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमधील पुरुष सर्वात कमी मद्यपान करतात.
मद्यपानाच्या बाबत सिक्कीमच्या महिला अव्वल :- ईशान्येकडील सिक्कीम राज्यातील महिला 16.2% आकडेवारीसोबत मद्यपानात देशात अव्वल आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर आसाम असून तेथे 7.3% महिला मद्यपान करतात. तर दारू पिण्याच्या बद्दल तेलंगणाचे पुरुष पहिल्या क्रमांकावर असून तेथील महिलाही दारू पिण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये