अहमदनगर Live24 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे,28 मे पर्यंत उद्धव ठाकरे यांना धोका नाही.
आमचा त्यांना विरोध नाही किंवा त्याला हरकत देखील नाही. मात्र महाविकासआघाडीकडून राजकारण सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

‘आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंञिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. उगीच आम्हाला कशाला बोट लावता? असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर आरोप केला आहे.
त्यांच्या आरोपानंतर पत्रकारांनी तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे, असा सवाल केला असता, पाटील म्हणाले, ‘मी कशाला नाव घेऊ? ज्याला टोपी बसेल त्याला बसेल.’ असं म्हणून उत्तर देण्याचं टाळलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाकडून उद्धव ठाकरे यांची राज्यपाल सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. परंतु,राज्यपालांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावाला परवानगी न दिल्यामुळे वाद पेटला आहे.
उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला आहे. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्तावच बेकायशीर असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®