Mahavitaran News: तुमचे पैशांचे बजेट पाहून वापरा वीज! आता नाही राहणार जास्तीच्या वीज बिलाची झंझट

Ajay Patil
Published:
preped meter

Mahavitaran News:- वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंपासून ते दैनंदिन वापरातल्या अनेक गोष्टींमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याला घरात आपण वापरात असलेली वीज देखील अपवाद नाही. विजेचे दर देखील भरमसाठ वाढल्यामुळे बऱ्याचदा वाढीव वीज बिलाचा फटका बसतो व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कधी कधी बऱ्याच तक्रारी पाहायला मिळतात की विजेचा वापर केल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वीज बिल येते.

अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला या अनुषंगाने दिसून येतात. परंतु आता या समस्यांवर तोडगा निघणार असून महावितरण याबाबतीत लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत असून वीज ग्राहकांना यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज असतो तेवढेच तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून संभाषण करणे किंवा इतर सेवांचा लाभ आपल्याला घेता येतो. अगदी याच पद्धतीने आता महावितरणचे प्लॅनिंग आहे व हे प्लॅनिंग काय आहे? याबद्दल माहिती घेणार आहोत.

 आता जेवढा बॅलन्स तेवढीच वापरता येणार वीज

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वीज ग्राहकांना आता त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च करता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना आता त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करता येण्याचा अधिकार मिळणार असून याकरिता प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसवण्याची तयारी सुरू झाली असून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे मीटर कार्यरत होणार आहेत. यामध्ये महावितरण आता एक कोटी 41 लाख ग्राहकांचे जे काही जुने मीटर आहे ते बदलणार आहे.

त्याऐवजी आता प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. यामुळे आता वीज ग्राहक हे मोबाईल प्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. म्हणजेच एकंदरीत आता विजेकरिता किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही किती वीज वापरली याची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळणार आहे व तुम्ही भरलेल्या पैशांपैकी किती पैसे अजून शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा किती वापर करायचा याचे नियोजन देखील ग्राहकांना करता येणार आहे.

आणखी मिळतील या सुविधा

या स्मार्ट मीटरमध्ये ग्राहक आणि जे पैसे भरलेले असतील ते पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. परंतु ग्राहकांना मोबाईलवर त्यांनी वापर केलेल्या विजेची माहिती मिळाल्यामुळे किती पैसे उरले आहेत हे त्यांना समजेल व नव्याने पैसे भरणे देखील ग्राहकांना सोपे होईल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंटची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. तुम्ही भरलेले पैसे संपत आल्यानंतर तुम्हाला याबाबतचा संदेश मोबाईलवर येईल.

समजा ग्राहकाने विजेसाठी पैसे भरले आहेत व ते पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री विजपुरवठा बंद होणार नाही. यामध्ये प्रामुख्याने सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा चालू राहिल. त्यामुळे ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा चालू ठेवायचा. तुम्ही पैसे भरल्यानंतर तुम्ही पैसे संपल्यानंतर जे काही वीज वापरलेली आहे त्याचे पैसे वजा होतील अशी देखील सुविधा या स्मार्ट मीटरमध्ये देण्यात आली आहे.

 किती राहिल या स्मार्ट मीटरचा खर्च?

महत्वाचे म्हणजे या नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर साठी ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नसून या मीटरचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही अनुदान मिळणार आहे तसेच महावितरण च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe