नाद करा पण आमचा कुठं! साताऱ्यात प्रचारासाठी चक्क बोलावली अभिनेत्री

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-  सध्या राज्या मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीचं वातावरण आता दिवसेंदिवस पेट घेत आहे. निवडणुकीतील सामान्य मतदारांना असामान्य वाटावं म्हणून उमेदवार काही ना काही शक्कल लढवत असतात.

मतदारांना कस आकर्षित करावं या कडेच त्यांचं जास्त लक्ष असत. त्यातच विविध गावांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावांमधील पॅनल आणि मंडळ विविध प्रकारच्या अतरंगी गोष्टी करताना दिसत आहे. असाच एक पराक्रम साताऱ्या मध्ये एका पॅनल कडून करण्यात आला आहे.

सातारा मध्ये लागत असणाऱ्या वाढे या गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. या अंतिम टप्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावातील पॅनल ने चक्क मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे हिला प्रचारासाठी बोलवलं आहे आणि ती सुद्धा प्रचार करताना दिसली आहे.

वाढे गावातील अजिंक्य पॅनल ने हे अतरंगी काम केले आहे. प्रिया बेर्डे यांचा जिप्सी गाडीतून रोड शो करून त्यांनी प्रचाराची सांगता केली आहे. प्रिया बेद्रे यांना पाहण्यासाठी वाढे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वाढे गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अंजिक्य पॅनल व वाढेश्वर पॅनल यांच्या मध्ये दुरंगी लढत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe