मॅट्रिमोनीवरून महिलांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   विवाहासाठी इच्छुक वर तसेच वधू प्राप्तीसाठी अनेक विवाहनोंदणी (मॅट्रिमोनी) वेबसाईट उपलब्ध आहेत.

मात्र अशाच एका वेबसाइटवरून महिलांना फसविणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, आरोपी कुणाल नंदकुमार जगताप ( वय ३७ वर्षे. रा.घर.नं.६, व्दारकाधिश हौसिंग सोसायटी,

काटेगल्ली, त्रिकोणी गार्डनजवळ, व्दारका नाशिक) याने जीवनसाथी डॉट कॉम यावरुन फिर्यादीशी संपर्क करून फसवणुकीने लग्न केले. तसेच ईमेलवरुन धमकी देणारे मेल पाठविले.

आरोपीने फिर्यादी सह अनेक मुलींना जीवनसाथी डॉट कॉम यावरुन कॉन्टॅक्ट करुन त्यांचेशी रिलेशिनशिपमध्ये राहुन त्यांना देखील फसविले आहे. या फिर्यादीवरून त्याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नमुद आरोपी कुणाल नंदकुमार जगताप हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. आरोपी हा इंजिनिअर असल्या कारणाने त्याला शोधण्यास अडथळे निर्माण होत होते.

अथक प्रयत्नानंतर आरोपी हा बँगलोर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तात्काळ सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी बँगलोर मधून पोलीसांच्या मदतीने आरोपीस सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment