श्रीगोंदे :- शहरातील एका निदर्यी मुलाने आपले कर्ज फेडण्यास बापाने पैसे देण्यास नकार दिल्याने चक्क वृद्ध आई-वडिलांना या माथेफिरू मुलाने बेदम मारहाण केली.
याबाबत वृद्ध पित्याने दत्तात्रय सदाशिव दहातोंडे (वय ६०) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीगोंदे शहरातील दत्तात्रय सदाशिव दहातोंडे (बगाडे कॉर्नर, श्रीगोंदे) येथे राहत असून त्यांना २ मुले असून ते विभक्त राहतात.
संदीप दहातोंडे हा मुलगा २६ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घरी येऊन म्हणू लागला की माझ्यावर खूप कर्ज झाले. ते फेडण्यासाठी मला पैसे द्या असे म्हणला,
त्यावर वडील दत्तात्रय म्हणाले की तुला आतापर्यंत खूप पैसे दिले. या वयात मी कुठून पैसे देऊ, माझ्याकडे पैसे नाहीत. मी तुला पैसे देणार नाही, असे म्हणताच वडिलांना मारहाण केली.
भांडणे सोडवण्यासाठी दत्तात्रय यांची पत्नी व संदीप याची आई मध्ये पडली असता तिलाही संदीपने दगडाने मारहाण करून जखमी केले. जर तुम्ही मला कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले नाही, तर तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
याबाबत दत्तात्रय सदाशिव दहातोंडे यांनी मारहाण करणारा मुलगा संदीप दत्तात्रय दहातोंडे याच्या विरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..