अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- शहरातील रस्ते, खड्डे, नागरी सुविधा अशा अनेक कारणांमुळे चर्चेत असलेली अहमनगर महानगर पालिका आता पुन्हा एकदा वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.
शहरातील विकासनिधी लागल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केला असल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. कोरोना महामारीविरुद्ध पुकारलेले युद्ध

जिकंण्याच्या नावाखाली महापालिकेने १४ व्या आयोगाच्या कोट्यवधी रुपयांसह दलित वस्ती विकासनिधीदेखील हडप केला, असा गंभीर आरोप मनपाचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे.
या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी सोमवारी आयुक्तांना पात्र देणार असल्याचे बोराटे यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना बोराटे म्हणाले, की ‘कोरोनावर राज्यशासनाकडून किती पैसे आला, किती खर्च झाला, औषध किती रुपयांचे खरेदी केले,
ऑक्सिमीटर, पीपीई किट किती खरेदी केले, जेवणावळींवर किती खर्च झाला, तसेच दलित विकास निधी आणि अन्य कामांसाठीचे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
हे करत असताना महापौरांना कुठेही विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यांची कुठे सहीदेखील नाही. राज्य शासनाकडून येणार कोट्यवधी रुपयांचा निधी जर कोरोनावर खर्च केला गेला असेल तर
तो खर्च करणाऱ्या आयुक्त आणि आरोग्याधिकाऱ्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यासाठी आयुक्तांना येत्या सोमवारी पत्र देणार आहोत’.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved