Manoj Jarange : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे, यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे,
या मागणीसाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या तिसऱ्या टप्यातील उपोषणाचा मंगळवारी आज पाचवा दिवस आहे.
जरांगे- पाटील यांनी अन्न आणि पाणी सोडले आहे. अशा परिस्थितीत आता त्यांची प्रकृती अधिकच खालावली असून प्रकृती अधिकच बिघडल्याचे समोर आले आहे. जरंगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून इतकंच नाही तर त्यांना बोलताही येत नाही.
दरम्यान, डॉक्टरांचे पथक अंतरवली सराटी येथे पोहोचले आहे. मात्र, जरंगे यांनी औषधोपचारास घेण्यास नकार दिला आहे.सगेसोयरे अध्यादेश काढून विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरंगे यांनी घेतली आहे.
त्यांच्या भूमिकेबाबत डॉक्टरही चिंतेत आहेत. जरंगे पाटील यांनी तत्काळ उपोषण मागे घेऊन अन्न-पाणी स्वीकारावे, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.
दरम्यान काल विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन औषधोपचार घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला.
विभागीय आयुक्त मधुकर राजे आदर्ड, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मंगळवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत उपचार घेण्याबाबत विनंती केली.
मात्र, यास जरांगे-पाटील यांनी नकार दिला. सरकारला मराठा समाजाविषयी काही देणेघेणे नाही. पाच महिने होऊनही हैदराबादचे गॅझेटही मिळवता आले नाही. अध्यादेशाबाबत काहीच केले नाही.
१५ तारखेचे अधिवेशन सरकारने २०, २१ तारखेला ठेवले. सरकारचे काय चालले काहीच कळेना. मराठा समाजाशी सरकारने खेटू नये, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान, सलग चार दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे-पाटील यांची विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी भेट घेऊन औषधोपचार घेण्याची विनंती केली.