अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- मराठा महासंघातर्फे अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या घरासमोर मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती.
आंदोलकांच्या शिष्टमंडळासह मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईत मंत्रालयामध्ये भेट घेतली.

यावेळी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा संभाजीराव दहातोंडे यांनी यावेळी मुंबईतून केली.
या भेटीसाठी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे यांनी पुढाकार घेतला. मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत काळे, रावसाहेब मरकड उपस्थित होते.
ना. थोरात यांनी यावेळी आंदोलकांना शासनाने उचललेल्या पावलांची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी यासाठी खंडपीठाकडे विनंती अर्ज केला आहे.
महाराष्ट्र शासन आरक्षण टिकावे यासाठी अत्यंत गंभीर असून शासन म्हणून सर्वतोपरी काळजी घेत प्रभावीपणे न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम शासन करत असल्याची माहिती ना. थोरात साहेब यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved