Marathi News : ग्रामीण रुग्णालयांत मिळणार आजपासून मोफत उपचार !

Marathi News :- महाराष्ट्र शासनाचा क्रांतिकारी निर्णय १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार सगळया रुग्णांना मोफत सुविधा. या संबंधित सूचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना १२ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या आहेत.

या पूर्वी काही ठराविक रुग्णांना मोफत उपचार दिला जात होता व इतर रुग्णांकडून शासकीय दर पत्रकानुसार शुल्क आकारले जात असे.या मुळे काही रुग्ण उपचार घेण्यापासून वंचित राहत होते तसेच त्यांना पैसे भरणा करण्यासाठी रांगेत उभे राहून त्यांचा ‘वेळ वाया जात असे,या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन प्रत्येक रुग्णांना वेळेत उपचार मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यामुळे आता त्यामुळे रुग्णांची गर्दी वाढू शकते रुग्णांना मोफत सेवा मिळणार आहे. यासाठी संबंधित रुग्णाल्यांमध्ये यंत्रणा एखाद्या रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्ताची गरज भासल्यास राष्ट्रीय रक्‍त धोरणानुसार वरक्त घटक पुरवठा या नियमानुसार असणारे शुल्क भरावेच लागणार.

औषध बाहेरून आणावे लागले तर? सार्वजनिक रुग्णालयात चर्चित वेळ प्रसंगी बाहेरील औषधे रुग्णास गरज लागल्यास रुग्ण कल्याण समितीच्या अनुदानातून स्थानिकरीत्या औषध खरेदी करून रुग्णास मोफत देण्यात यावी. रुग्ण आंतररुग्ण विभागामध्ये दाखल झाल्यास, रुग्णास डिस्चार्ज देताना कोणतेही शुल्क आकारू नये. यापूर्वी रुग्णांकडून जमा करण्यात आलेले शुल्क शासन खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करावे.

काही रुग्णांना शासकीय दर देणे सुद्धा शक्‍य नव्हते त्यामुळे ते रुग्ण उपचारापासून वंचित राहत होते.त्यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सर्व रुग्णांना मोफत सेवा हा निर्णय घेतला असून याचा लाभ यापुढे अनेक रुग्ण घेतील. हा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्यांचे आभार देखील मानत आहे.

मोफत सुविधा म्हटलं की मोठी गर्दी रुग्णाल्यांत होवू शकते त्यामुळे दिले जाणारे उपचार कसे असतील हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या संबंधित कुठल्याही तक्रारी असल्यास रुग्णांनी १०४ टोल फ्री क्रमांक वर तक्रार नोंदविण्यात यावी तसेच तक्रार नोंदवल्यानंतर रुग्णांच्या तक्राची निवारण त्वरित करण्यात येईल असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe