अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- मागील वेळेस स्वच्छता सर्वेक्षणात शेवटून पाचवा क्रमांक असणार्या जामखेड शहराला स्वच्छता सर्वेक्षणात सहभाग घेऊन सर्वानी एकत्र येऊन एकजुटीने काम करत जामखेड शहराला पहिल्या पाच मध्ये आणायचे आहे असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी केले.
शासकीय विश्रामगृहात स्वच्छ जामखेड निरोगी जामखेड करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ मध्ये सहभाग घेतला आहे त्यासाठी बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आणि रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते सह पत्रकार उपस्थित होते. जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
२१ प्रभागात नियोजन करावयाचे आहे. नदी स्वच्छता करावयाची आहे. व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, विद्यार्थी, बचतगट, महिला सर्वाना सहभागी करून घ्यावयाचे आहे अस्वच्छ जामखेड ला सुंदर जामखेड करावयाचे आहे. नव्वद दिवसात हे काम करावयाचे आहे. प्रत्येकाने आपापल्या घरापासून स्पर्धा सुरु करावयाची आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved