अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- शहरातील नाईकवाडापुरा भागात राहणाऱ्या एका ३० वर्ष वयाच्या तरुणीला आरोपी मौलाना इर्शाद मखदुम, रा.श्रीरामपूर याने पिडीत तरुणीच्या मोबाईल नंबरवर आरोपीचा मोबाईल नं. ९३२५५०५२५२ या मोबाईल नंबरवरुन वेळोवेळी मेसेज पाठविले.
फोटो वाईट उद्देशाने पाठवून तसेच तरुणी रहात असलेल्या संगमनेर नाईकवाडापुरा परिसरात आरोपीने विचारपूस करून मनात वाईट उद्देश ठेवून ३० वर्षाच्या तरुणीस लज्जा उत्पन्न होईल, असा मेसेज पाठवून विनयभंग केला व छुपा पाठलाग केला.
वरीलप्रमाणे नाईकवाडापुरा परिसरात राहणाऱ्या ३० वर्ष वयाच्या तरुणीने संगमनेर शहर पोलिसांत काल फिर्याद दिल्यावरुन आरोपी मौलाना इर्शाद मखदुम, रा. श्रीरामपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.