७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेच्या स्थानकांच्या अंतिम टप्प्यातील कामाचे कंत्राट नुकतेच वितरीत करण्यात आले आहे.मेट्रो ६ मार्गिका या गुलाबी मेट्रोच्या १५.१८ किमी.उन्नत मार्गिकेदरम्यान १३ स्थानकांचा समावेश आहे.दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ऑगस्ट महिन्यात तीन स्थानकांच्या कामांसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये निविदा मागवल्या होत्या.
एसएस एसएस कन्स्ट्रक्शन्सने एमएमआरडीएकडून २४ महिन्यांच्या मुदतीसाठी पवई ते विक्रोळी दरम्यानच्या तीन स्थानकांसाठी २६४७६.६८ कोटी रुपयांना घेतले आणि २४ महिन्यांची अंतिम मुदत दिली आहे. पहिल्या टप्याच्या कंत्राटानुसार मुंबई मेट्रो लाइन-६ प्रकल्पाच्या आयआयटी पवई, कांजूर मार्ग (प.) आणि विक्रोळी (प.) या तीन (३) उन्नत स्थानकांवर प्री-इंजिनीअर्ड बिल्डिंग (पीईबी) स्ट्रक्चर्सचे डिझाइन, फॅब्रिकेशन, पुरवठा, उभारणी आणि छताचे शीटिंग आणि बाह्य दर्शनी भागाचे डिझाइन आणि बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता स्थापना, ड्रेनेज, साइट डेव्हलपमेंट कामे यांचा समावेश आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-15.jpg)
महाकाली लेणी, सीप्झ गाव, साकी विहार रोड, रामबाग, पवई तलाव या स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात करण्यात येणार आहे.दुसऱ्या टप्प्यात नीव जेव्हीने एमएमआरडीएकडून १६५. ९३ कोटी रुपयांच्या आणि २४ महिन्यांच्या अंतिम मुदतीत पॅकेज सीए-२६६ मिळवले आहे.या कामासाठी नियुक्त कंत्राटदार स्वामी समर्थ नगर आणि श्याम नगर दरम्यानच्या ५ उन्नत स्थानकांसाठी स्थापत्य फिनिशिंग कामांसाठी जबाबदार असणार आहे.
यामध्ये स्वामी समर्थ नगर,आदर्श नगर,जोगेश्वरी प.), जेव्हीएलआर, श्याम नगर या स्थानकांचा समावेश आहे, तर या स्थानकांवर प्री-इंजिनीअर्ड बिल्डिंग (पीईबी) स्ट्रक्चर्सचे डिझाइन, फॅब्रिकेशन, पुरवठा, उभारणी आणि छताचे शिटिंग आणि बाह्य दर्शनी भागाचे साइट डेव्हलपमेंट इत्यादी कामे अपेक्षित आहे.