देवदर्शन घेवून नवरदेवाची नजर चुकवून नववधूची प्रियकरासोबत धूम !

Ahmednagarlive24
Published:

हिंगोली : प्रेमासाठी काहीही करण्याची मानसिकता आजच्या प्रियकर व प्रियसीमध्ये रूजल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या प्रेम प्रकरणातून नववधुने चक्क आपल्या प्रियकरासोबत नवरदेवाची नजर चुकवून धूम ठोकल्याची घटना घडली आहे.

सप्तपदीच्या फेऱ्या घेतल्यानंतर एक नवदाम्पत्य औंढा येथील नागनाथाच्या दर्शनाला आले होते. पण, दर्शन घेतल्यानंतर चक्क नववधूने नवरदेवाला बगल देऊन प्रियकरासोबत दुचाकीवरून सिनेस्टाईल धूम ठोकली.

हा प्रकार शनिवारी (दि.२५) सायंकाळी ५ च्या सुमारास घडला.. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची अनेक उदाहरणे डोळ्यांसमोर असताना याचीच प्रचिती औंढा येथील प्रकारावरून पुन्हा एकदा आली आहे.

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला दर्शन करण्यासाठी दररोज अनेक नवदाम्पत्य येत असतात. शनिवारीही नवदाम्पत्य नागनाथाच्या दर्शनासाठी आले होते.

दर्शन झाल्यानंतर बसस्थानकाच्या आवारातील एका हॉटेलमध्ये सर्वजण चहापाणी घेण्यासाठी गेले असता नववधूने चक्क नवदेवास बगल देऊन हॉटेलसमोर उभ्या असलेल्या प्रियकराच्या मोटारसायकलवर बसून सिनेस्टाईल धूम ठोकली.

ही बाब नवरदेवाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हॉटेलबाहेर येऊन आरडाओरड केली. त्यावेळी सोबत असलेल्या नववधूच्या वडिलांनी मुलीला आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला.

पण, नखशिखांत प्रेमात बुडालेल्या या नववधूने दोघांच्याही आवाजाकडे दुर्लक्ष करत प्रियकराच्या खांद्यावर हात टाकून धूम ठोकली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment