अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :- पहाटेच्या शपथ विधीनंतर अजित पवार यांच्या सोबत काही आमदार आले असते तर आमचे सरकार बनले असते. अजित पवार शपथविधीला आले मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलविल्यानंतर पुन्हा निघून गेले.
मात्र ते शपथविधीला आले होते. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते तर ते पुन्हा इकडे आले असते. त्यांना ते पद द्यायला नको होते, असे मत केंद्रीय मंत्री तथा आरपीआय (आठवले गट)चे नेते रामदास आठवले यांनी मांडले.

आज अहमदनगर दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. आठवले पुढे म्हणाले की, शिवसेना आमच्या सोबत येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार पडत नाही हे आम्हाला माहिती आहे.
राष्ट्रवादी आमच्या सोबत येत नाही अथवा काँग्रेस पाठिंबा काढत नाही तोपर्यंत सरकार पडत नाही. सरकार पडेल अशी आमची भावना नाही. सरकार जर पडले तर ते आपल्या कर्मामुळे पडेल.
सरकार पडले तर आम्ही तयारी करत आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अरविंद केजरीवाल हे सक्षम विरोधक म्हणून चर्चे आहेत मात्र नरेंद्र मोदींच्या विरोधात केवळ केजरीवालच नाही तर शरद पवार,
ममता बॅनर्जी आहेत. देशातली सर्व विरोधकांचा विरोध परतावून लावण्यासाठी मोदी आणि आम्ही सक्षम आहोत, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.