अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- नांदेड जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणीवर ॲसिड व पेट्रोल टाकून जाळल्यानंतर काही तासांनी रुग्णालयात त्या तरुणीचा मृत्यू झाला. हा प्रकार संतापजनक असून बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून,
तातडीने आरोपींना अटक करावी तसेच कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलिसांना दिले आहेत.
याबाबत श्री.मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पुणे येथे वास्तव्यास असलेल्या व मूळच्या नांदेड जिल्ह्यातील असलेल्या २२ वर्षीय तरुणीला पुणे ते नांदेड प्रवास करत असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोबतच्याच संशयित आरोपींनी आधी ॲसिड टाकून व नंतर पेट्रोल टाकून जाळले.
आज जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल श्री. मुंडे यांनी दुःख व संताप व्यक्त केला असून, बीड पोलीस तातडीने आरोपीला गजाआड करण्यात यशस्वी होतील, तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved