अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनीता गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा अहवाल आल्यानंतर मंत्री गडाख होम क्वारंटाइन झाले होते.
दरम्यान पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गडाख यांनी तपासणी करून घेतली होती. रात्री उशिरा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मंत्री गडाख यांच्या पत्नी पंचायत समिती माजी सभापती सुनीता गडाख यांचा शुक्रवारी (१७ जुलै) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
मंत्री गडाख यांची शनिवारी कोरोना चाचणी घेण्यात आली . त्यांनी या संदर्भात ट्वीट करून नागरिकांना घरी रहा, सुरक्षित रहा, कुटुंबाची काळजी घ्या, असा सल्ला दिला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]