अल्पवयीन तरुणीची श्रीगोंदा बसस्थानकात छेडछाड!

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रकार दि. ९ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा बसस्थानकात घडला.

याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून किशोर बाळू गोडसे याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर तरुणी श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेते. ती दररोज गावाकडून एसटी बसने महाविद्यालयास येते.

संबंधित तरुण हा या तरुणीचा नेहमी पाठलाग करायचा तसेच तिच्याकडे वाईट भावनेने पाहायचा. दि. ९ रोजी सकाळी तरुणी बसने महाविद्यालयात येत असताना

संबंधित तरुण हा तरुणी बसलेल्या शिटजवळ येऊन उभा राहिला व तरुणी श्रीगोंदा बसस्थानकावर एसटीतून उतरत असताना तिला लज्जाउत्पन्न होईल, असे वर्तन केले.

त्यावर सदर तरुणीने तरुणाला जाब विचारत मला त्रास देऊ नकोस, असे बज़ावले, त्यावर तरुणाने या तरुणीला दमदाटी करत धमकावले.

घडला प्रकार मुलीने तिच्या घरच्यांना सांगितला व घरच्यांसोबत येऊन श्रीगोंदा पोलिस स्टेशनला त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment