अहमदनगर :- ज्या लोकांनी खासदार दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे विमानतळ पळवून नेले. ते दक्षिण मतदारसंघाचा विकास काय करणार?
या तालुक्यात विमानतळ झाले असते, तर मोठा विकास झाला असता. त्यांनी विमानतळ उत्तरेत पळवले.

पण स्वतःचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागोजागी हेलिपॅड तयार केले, असा टीकेचा टोला राष्ट्रावादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मारला.
जेऊर बायजाबाई येथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अयोजित करण्यात आली होती.
आमदार जगताप यांनी बायजामातेचे दर्शन घेऊन आठवडी बाजारात भाजीपाला आणि फळविक्रेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
आमदार जगताप आपल्या भाषणात म्हणाले, मी विधानसभेत शहराचे प्रतिनिधित्व करतो.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरून सभागृहात आवाज उठवल्याने मला एक वर्षासाठी निलंबित केले होते. विरोधी पक्षनेते कितीवेळा निलंबित झाले ते त्यांनी सांगावे.
मी शहरात रहात असलो, तरी माझी नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. बाहेरचे लोक इथे येतील, गोड गोड बोलून मोठी स्वप्ने दाखवतील.
विकासाच्या केवळ वल्गना करून जनतेला स्वप्ने दाखवणारे २३ मार्चनंतर गायब होतील. पण मी कुठेही जाणार नसून कायम तुम्हाला भेटणारा आहे.
- पिवळ सोन पुन्हा चमकल ; ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला 6,250 रुपयांचा भाव
- 801 किमी नाही, आता 840 किलोमीटर…..; 11 ऐवजी ‘या’ 13 जिल्ह्यांमधून जाणार नवा शक्तीपीठ महामार्ग !
- पुणे मेट्रो बाबत महत्त्वाची अपडेट ! 27 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीस यांनी दिली माहिती
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! देशातील ‘या’ चार बँकांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला आरबीआयची मंजुरी
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केवायसी केल्यानंतरही ‘या’ महिलांना लाभ मिळणार नाही













