नेवासा :- आमदार बाळासाहेब मुरकुटे हे विकास दिंडीच्या माध्यमातून मंगळवारपासून १२ सप्टेंबरपर्यंत नेवासे तालुक्यातील गावोगावी जनजागृती करणार करणार आहेत.
केंद्र व राज्य सरकारने गोरगरिबांसाठी राबवलेल्या योजनांसह लोकप्रतिनिधी नात्याने तालुक्यातील विकासकामांचा लेखाजोखाही ते गावोगावच्या बैठकांत जनतेसमोर ठेवणार आहेत.

जिल्ह्यात विकासकामांचा सर्वाधिक ओघ नेवासे तालुक्यात आणल्याचा आमदार मुरकुटे यांचा दावा आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, सभामंडपासह अंतर्गत रस्ते,
नेवासे नगर पंचायतसाठी आणलेला निधी, स्पर्धा परीक्षा केंद्रे, वीज उपकेंद्रे, तसेच केंद्र वराज्य सरकारच्या योजना गोरगरिबांपर्यंत कशा पोहोचवण्यात आल्या याची माहिती ते विकास दिंडीतून देणार आहेत.
आम्ही विकासाचे कर्तव्य पार पाडले, तुम्ही आता इतिहास घडवण्याचे कर्तव्य पार पाडा असा उपदेश मुरकुटे दिंडीत करणार आहेत.
- गुंतवणूकदारांना 5 शेअर्स मोफत मिळणार ! ‘ही’ कंपनी देणार Bonus Share ; रेकॉर्ड तारीख नोट करा
- निवडणूक आयोगाचा निर्णय आला…! लाडक्या बहिणींना संक्रांतला 3,000 रुपये मिळणार का ?
- गोल्डन टाइम आला रें…; ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- राज्यात 2 दिवस पावसाचे ! अहिल्यानगर, पुणे, सातारासह ‘या’ 15 जिल्ह्यातील हवामान बिघडणार
- पोस्टाची सुपरहीट योजना : इथे गुंतवलेले पैसे काही महिन्यातच होतात दुप्पट !













