आमदार नीलेश राणे यांना अहमदनगर जिल्ह्यात फिरू देणार नाही …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- गुंडगिरी, दडपशाही, अश्लिल भाषा हिच ओळख असलेले आमदार नीलेश राणे यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर अनुचित अनुद््गार काढले आहेत.

आमदार रोहित पवार हे एक अभ्यासू आणि कर्जत-जामखेडचेच नव्हे, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्यावर आमदार नीलेश राणे हे विनाकारण खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत.

यापुढे त्यांनी बोलण्याची पातळी चांगली ठेवावी; अन्यथा त्याला जशास तसे उत्तर देऊन नीलेश राणे यांना अहमदनगर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश गडाख यांनी दिला आहे.

टीका टिप्पणी आम्ही सहन करणार नाही आमदार पवार हे एक रचनात्मक काम करणारे कुशल प्रशासक आहे. राणेंनी त्यांच्या कामाची माहिती घ्यावी, म्हणजे चांगले राजकारण व समाजकारण कसे करावे हे समजेल.

पवार घराण्याला मोठा सामाजिक राजकीय वारसा आहे. राणेंचा भुतकाळ, इतिहास आणि वर्तमानकाळ संपूर्ण राज्याला माहिती आहे. तेव्हा राणेंनी पवारांवर बोलताना विचार करावा.

यापुढे कठलीही टीका टिप्पणी आम्ही सहन करणार नाही. जशास तसे उत्तर देऊ. कर्जत-जामखेड मतदारसंघ नाही, तर संपूर्ण नगर जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही गडाख यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment