श्रीगोंदा :- राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे.
गत काही दिवसांपासून मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आ. जगताप यांच्या पक्षांतराचे वारे वाहत आहेत. भाजपच्या श्रेष्ठींकडूनही आ . जगताप हे गळाला लागण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल जगताप यांना उमेदवारी दिली.
त्यांच्याविरोधात भाजपचे बबनराव पाचपुते यांनी निवडणूक लढविली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची केली.
त्यामुळे पवार हे स्वतः जगताप यांच्या विजयासाठी श्रीगोंद्यात सर्वपक्षीयांची मोट बांधली. सर्व नाराजांची समजूत काढून जगताप यांच्या विजयाचा मार्ग सोपस्कर केला.
स्वतः पवार यांनीही प्रचाराची सांगता सभा श्रीगोंद्यात घेत मोठी ताकद देण्याचे काम केले. पवार – पाचपुते यांच्या राजकीय वादाची किनार या लढ्याला होती.
मात्र , असे असतानाही स्वत : पवार यांनी पाचपुतेंना रयत शिक्षण संस्थेवर पुन्हा घेतले . त्यामुळे पवार – पाचपुते यांच्यातील दुरावा कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र , पाचपुते हे अजूनही भाजपमध्येच असून , ते पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून येतात.
गत काही दिवसांपासून आ.जगताप हे भाजपच्या गळाला लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी प्राथमिक बोलणी झाल्याचेही कार्यकर्ते बोलत आहेत.
- भारतात पहिली कार नेमकी कधी आणि कुणी आणली…काय होती तिची किंमत?, 90% लोकांना माहीत नसेल याचा खरा इतिहास!
- Ladki Bahin Yojana | जुलैचा हफ्ता जमा होण्याआधीच फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! उपमुख्यमंत्र्यांची घोषणा चर्चेत
- नाशिक – अक्कलकोट प्रवास आता फक्त 4 तासात ! ह्या महामार्ग प्रकल्पाला मिळाली मोठी प्रशासकीय मंजुरी
- ऑगस्ट महिना ठरणार लकी ! 11 ऑगस्ट 2025 नंतर ह्या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?