आमदार रोहित पवार म्हणाले…मलाही ED ची नोटीस येईल

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-अभ्यासू वृत्ती तसेच जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात.

नुकतेच रोहित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. सध्या राज्यात निवडणुकीबरोबरच ईडीचे वारे वाहू लागले आहे.

बड्या बड्या राजकीय नेत्यांना ईडी द्वारे नोटीस धाडल्या जाऊ लागल्या आहेत. याच मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.

यावेळी रोहित पवार म्हणाले कि, नोटीस भाजपाच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. भाजपाच्या विरोधकांना नोटीस आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने होत आहे.

उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल. सर्वसामान्यांना सुद्ध आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचं लक्षात आलं आहे.

इतकी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात जात आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही असं रोहित पवार यांनी म्हंटले आहे.