राहुरी :- आपले शिक्षण कमी असले, तरी आपण फिल्डवर काम करतो, त्यामुळे जनतेचे प्रश्न काय आहेत,
ते शासन दरबारी कसे मांडायचे आणि मंजूर करून घ्यायची हातोटी आपल्याकडे आहे.

त्यामुळेच राज्यात सर्वाधिक निधी राहुरी – नगर – पाथर्डी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आणला आहे.
आपण केलेला विकास कोणाला पहायचा असेल, तर या मतदारसंघात येऊन पहा, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील पोखर्डी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.
या वेळी आमदार निधीतून गणपती मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, संरक्षक भिंत बांधणे, राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी २१ लाख रुपयांच्या पाणी योजनेचे भूमिपूजन,
वन विभागाच्या योजनेतून १०० गॅस कनेक्शन वितरण, दलित वस्ती सुधार योजना, १४ व वित्त आयोग,
ग्राम निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटने करण्यात आली.
कर्डिले म्हणाले, गेल्या २५ वर्षांत जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांनी अनेकदा आपणास राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला.
परंतु प्रत्येक वेळी जनता भक्कमपणे पाठीशी राहिल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले.
आपले राजकारण हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांसाठी असते हे जनतेलाही चांगलेच माहीत झालेले आहे.
त्यामुळे नेते कितीही विरोधात गेले, तरी जनता बरोबर असल्याने आपण कोणत्याही निवडणुकीची चिंता कधी करत नसल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
- महाभारत काळाच्या आधीपासून अस्तित्वात असलेले ‘हे’ झाड अजूनही जिवंत, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये नोंद!
- महाराष्ट्रातील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2016 नंतर प्रथमच असं घडणार, शालेय शिक्षण विभागाचा आदेश
- पाकिस्तानमधील 5 सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंची यादी, एकजण कोट्यवधींचा मालक असूनही खातोय जेलची हवा!
- मागासवर्गीयांचा निधी न वापरल्याने कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतच केली बरखास्त ; ग्रामविकास मंत्रालयाचा आदेश
- सुपा पोलिसांच्या ताब्यातील परप्रांतीय तरुणाचा मृत्यू ; सीआयडी उकलणार गूढ!