अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेतून भाजपकडून डॉ सुजय विखे आणि राष्ट्रवादी कडून आ.संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर होतात भाजप आमदार आणि जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर असणारे आ.शिवाजीराव कर्डिले धर्म संकटात पडले होते.
पक्षाने दिलेल्या उमेदवाराच काम कराव कि जावई संग्राम जगताप हा प्रश्न त्यांच्या समोर पडला,आजवरच्या नगर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात कर्डिले पक्षापेक्षा सोयीचे राजकारण करण्यात ‘पटाईत’ होते.
आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून या विधानसभा निवडणुकीकडे बघितले गेले. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे आता खासदार झाले.
लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना दक्षिणेतील सर्व तालुक्यात सर्वाधिक लीड हे राहुरीतूनच मिळाले असल्याने आता मात्र आ.कर्डिले यांनी या निवडणुकीत स्वताच्या राजकीय भविष्याच विचार केल्याचे दिसुन आले आहे.
आमदार शिवाजी कर्डिलेंच्या पुढील राजकीय वाटचालीस यामुळे सुकरता येणार आहे.आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निवडणूक भुमिकेवरील साशंकतेचे सावट या मोठ्या मताधिक्याने निश्चितच दूर होईलच. त्यांचे पक्षातील वजन या मताधिक्याने व निवडणुकीतील त्यांचे भूमिकेने निश्चितच वाढेल.
आमदार शिवाजी कर्डिंलेचे काही कार्यकर्ते आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर होते. याचा अर्थ आमदार कर्डिलेंनीच त्यांना तसे करावयास सांगितले आहे. ते देखील आतून सहकार्य करतील, असे सांगितले गेले. वास्तवात तसे झाली नाही. परिणामी विखेंचा वारु सुसाट सुटला.
- प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट
- कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर
- २ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..