अकोला :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पूत्र आमदार वैभव पिचड भाजपमध्ये जाणार, अशी अफवा मागील काही दिवसांपासून होती. आज अखेर तीच अफवा खरी ठरू पाहत आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड भाजपचा गळाला लागले असून, आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दिवसभर खलबते सुरू असल्याचे समजते.
आमदार वैभव पिचड यांच्या बंडखोरीची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असून जर जागेची “खांदेपालट” झाली तर “भाजप” नाहीतर “शिवसेना” असा नाट्यमय प्रकार मुंबईत सुरू आहे.
आमदार पिचड मुंबईला जाताच पुन्हा पक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा तालुक्यात धडकली. राष्ट्रवादी, सेना, भाजपच्या स्थानिक कार्यकत्यांनी खासगीत त्यास दुजोराही दिला आहे.
मंगळवारी मातोश्रीवर आणि बुधवारी वर्षा बंगल्यावर मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने भाजप व सेनेच्या प्रमुख नेत्यांशी आमदार पिचड व त्यांच्या समर्थकांची पक्ष बदलाबाबत वाटाघाटीची चर्चा झाली असे वृत्त तालुक्यात धडकले असून याची कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
- अहिल्यानगरमधील आयुष रुग्णालयातील मेडिकलवाल्याचा खोडसाळपणा, रुग्णाला जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिल्याची तक्रार
- अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू, प्रभागनिहाय आढावा घेऊन बुथ सक्षम करण्यावर भर
- कोमात गेल्यानंतर शरीरात नक्की काय घडतं?, मेंदू पूर्णपणे बंद पडतो का? जाणून घ्या यामागील धक्कादायक सत्य
- Shivratri 2025 : तब्बल 24 वर्षांनी शिवरात्रीला जुळून येतोय दुर्मिळ योग, 12 पैकी कोणत्या राशीला लाभणार शिवकृपा? वाचा!
- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा! आता राज्यसभेचे कामकाज कोण सांभाळणार?, नवीन निवडणूक कधी आणि कशी होणार? जाणून घ्या सर्वकाही