अहमदनगर :- आमदार वैभव पिचड हे भाजप च्या वाटेवर असल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादीकडून खंडन करण्यात आले आहे.
आ.पिचड यांच्या समर्थकांनी आमदार पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाहीत, मात्र काही राजकीय कामांच्या व्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क म्हणजे भाजप प्रवेश असा प्रचार म्हणजे राजकीय अफवा आहे.
आमदार पिचड यांच्या मुलीचा सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश यादीत नाव आले आहे. तेथील प्रवेश बदलून तो मुंबई येथील महाविद्यालयात मिळावा,
यासाठी त्यांनी मंत्री विखे, गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याचा भाजप प्रवेशाची संबंध नाही, असा राष्ट्रवादीकडून हवाला दिला आहे.
मुलाखतीस आ.वैभव पिचड गैरहजर !
आ.वैभव पिचड आज अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखातीस गैरहजर होते,दरम्यान भाजप प्रवेशा मुळे कि अन्य इतर कारणामुळे ते गैरसमज राहिले हे अद्याप तरी उघड झालेले नाही.
- अमेरिकेचे एफ-22 की भारताचे राफेल…जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमाने कोणत्ती? पाहा टॉप-5 यादी!
- आरबीआयचा महाराष्ट्रातील ‘या’ 3 बड्या बँकांना मोठा दणका ! ग्राहकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
- अहिल्यानगरमधील आयुष रुग्णालयातील मेडिकलवाल्याचा खोडसाळपणा, रुग्णाला जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिल्याची तक्रार
- अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू, प्रभागनिहाय आढावा घेऊन बुथ सक्षम करण्यावर भर
- कोमात गेल्यानंतर शरीरात नक्की काय घडतं?, मेंदू पूर्णपणे बंद पडतो का? जाणून घ्या यामागील धक्कादायक सत्य