अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- सध्या देश अनेक आर्थिक संकटांशी सामना करत आहे. यात भारताचा जीडीपी दर फारच कमी झाला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अनेक तज्ज्ञही यावर चिंता व्यक्त करताना दिसतात. परंतु माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र ‘जीडीपी खाली आला की वर गेला याचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेसाठी अहोरात्र केलेल्या कामाचा विचार करा.

त्यांनी चीनसारख्या बलाढ्य देशालाही नमवलं आहे ते पहा’ असे प्रतिपादन केले. पंतप्रधान मोदींच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे.
सेवा सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या आशा सेविकांना विखे-पाटील यांच्या सहकार्यानं विमा पॉलिसींचं वितरण करण्यात आलं.
यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना राज्य सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, कोरोना काळात ज्यांच्यावर जबाबदारी होती, तेच घरात बसल्यामुळे सामान्य माणसाच्या हितासाठी कोणतंही काम राज्यात झालं नाही.
याउलट पंतप्रधान मोदींनी संकटाच्या काळात सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी निर्णय प्रक्रिया राबवली. २० लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर करुन
उद्योजकांपासून ते पथविक्रेत्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत सर्वांना योजना देऊन हा देश पुन्हा आत्मविश्वासाने पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved