अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि आ.रोहित पवार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावलेल्या पराभूत उमेदवारांनी आता कायदेशीर आखाड्यात उडी घेतली आहे.
श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते तर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत.
उमेदवारी अर्ज भरताना गुन्ह्यांची माहिती लपविणे, खोटी माहिती सादर करणे, निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न करणे, संपत्तीची माहिती लपविणे आदी कारणांनी आक्षेप दाखल करत पराभूत उमेदवारांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
श्रीगोंद्याचे आमदार बबनराव भिकाजी पाचपुते यांच्याविरुद्ध घनशाम प्रतापराव शेलार यांची याचिका क्र. २६/२०१९ दाखल. अहमदनगर येथील आमदार रोहित राजेंद्र पवार यांच्याविरुध्द ज्ञानदेव नरहरी सुपेकर यांनी याचिका क्र. २०/२०१९ दाखल केली आहे.