अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- तब्बल ५२ पिकांच्या ११४ गावरान वाणांची देशी बियाणे बँकेत जपवणूक करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहिबाई पोपरे यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आता पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी भेट दिलेल्या लोखंडी मांडण्यांमध्ये (रॅक) विराजमान होणार आहेत.
अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदीवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला असलेल्या राहिबाई यांनी देशी बियाण्यांची जपवणूक करीत अतुलनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांना अलिकडेच पद्मश्री पुरस्कराने गौरवण्यात आले आहे.
त्यापूर्वीही यांच्या या कामागिरीची अनेक सामाजिक संस्थांनी दखल घेत त्यांना पुरस्कार दिले आहेत. राहिबाईंना मिळालेले हे लाखमोलाचे पुरस्कार त्यांच्या बियाणे बँकेत ठेवण्यासाठी मात्र विशेष काहीही व्यवस्था नाही.
त्यामुळे ते तसेच जमीनीवर ठेवण्यात आले होते. आमदार लंके यांच्याशी जिव्हाळयाचे सबंध असलेल्या अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार लंके यांना त्यासंदर्भात माहीती दिल्यानंतर त्यांनी सर्व पुरस्कार ठेवण्यासाठी किती ‘रॅक’ लागतील याची माहीती घेण्याची सूचना केली.
त्यानंतर तात्काळ पाच ‘रॅक’ राहिबाईंच्या घरी पोहच करण्यात आले. राहिबाई यांनी पारंपारीक पिकांच्या बियाण्यांचे जतन करून अतिशय गौरवास्पद कामगीरी केलेली असून
त्यांच्या या कौतुकाच्या स्मृती सन्मानाने ठेवल्या जाव्यात असे सांगत आमदार लंके यांनी राहिबार्ईंसाठी आणखीही काही मदत हवी असल्यास ती तात्काळ दिली जाईल अशी ग्वाही दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved