जिल्ह्यात मनसेच्या इंजिनाला मिळतेय गती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतरांचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच कर्जत तालुक्यात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यानी राष्ट्रवादीत आज प्रवेश केला.

हि घटना ताजीच असताना आता पारनेर तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी पक्षाचा राजिनामा देऊन मनसेत प्रवेश केला.

त्या नंतर लगेचच त्यांची पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचा परिणाम तालुक्यात पक्षाने उभारी घेतली आहे.

त्यांनी पदभार स्वीकारल्या नंतर लगेचच तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्याचा सपाटा लावला आहे. अनेक गावात कार्यक्रम घेऊन त्यांनी कार्कर्ते जोडण्यास सुरूवात केली आहे.

नुकताच वडझिरे येथे माळी यांच्या उपस्थीतीत अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. पारनेर शहरात शहराध्यक्ष वसीम राजे यांनी तालुक्याच्या ठिकाणी कोरोना काळात गरजूंना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले तसेच मास्क

व सॅनिटायझरचे वाटप कले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातून पारनेर शहरात विविध कामानिमित्ताने येणा-या लोकांचेही कोरोना बाबत चांगले प्रबोधन होत आहे.

माळी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच पक्ष संघटनेला बळ मिळण्यास सुरूवात झाली असल्याचा प्रत्येय येथे आला. माळी यांच्या उपस्थीतीत झालेल्या या कार्यक्रमात या वेळी अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment