ऊर्जा मंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा मनसे जाळणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला राज्य सरकारने वाढीव बिलाचा शॉक दिला. लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिल आल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वीजबिल माफीचा निर्णय सोमवारपर्यंत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 24 नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाची पहिली ठिणगी मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी विदर्भातून पडणार आहे.

त्यावेळी विदर्भात वाढीव वीजबीलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे. राज्यात वाढीव बिलावरुन राजकारण तापले असून भाजप महिला आघाडीने मुंबईतील महावितरणाचे मुख्यालय प्रकाशगडावर मोर्चा आज काढला आहे.

पोलिसांकडून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोर्चाच्यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. प्रकाशगडासमोर भाजपचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. आंदोलकांनी गेटवर चढत आत घुसण्याचा प्रयत्न केला. वीजबीलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe