शिर्डी मतदारसंघात विकास कामातून लोखंडे यांचे ‘वलय’ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून निवडून आल्यावर जनता हीच आपली कवचकुंडले मानून पक्ष विरहीत कामाचा झपाटा खासदार सदाशिव लोखंडे यांनी करून

सांगेल त्याचे काम व मागेल त्याला निधी देऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकास कामे उभी करत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे.

गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या विश्रांतीतही आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेऊन कोरोनाच्या बचावासाठी साहित्याचे वाटप केले. विकास कामाचा निपटारा करण्यासाठी कार्यकर्त्यांशी ते सतत हितगुज केलेे.

पक्ष, संघटना सत्ताधारी, विरोधी या बाबींकडे न बघता ‘त्या’ कामाची गरज व समस्या ओळखून अशा कामांना लोखंडे प्राधान्य देत असल्याने शिर्डी मतदारसंघात विकास कामातून लोखंडे यांचे ‘वलय’ निर्माण होताना दिसून येत आहे.

समस्यांचा निपटारा करण्याचा विडा त्यांनी उचलल्यामुळे खासदार लोखंडे यांच्या कामामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment