‘ह्या’ गावातील तरुणांचे मोबाईल हॅक; महिलांना पाठवीले जातेय ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- सध्या सोशलमिडीयाचा वापर वाढलेला आहे. यात व्हाट्सअँपची लोकप्रियता प्रचंड आहे. वर्क फ्रॉम होम दरम्यान WhatsApp चे महत्त्व आणखी वाढले आहे.

परंतु आता हे देखील वापरणे धोक्याचे ठरत आहे. ज्या प्रमाणे इंटरनेटवरून संगणकाद्वारे फसवणुकीचे गुन्हे केले जायचे तसे आता मोबाईलद्वारे केले जात असल्याचे समोर आले आहे.

अकोले तालुक्यातील कातळापूर गावात अशीच एक धाकदायक घटना समोर आली आहे. येथे ५० पेक्षा अधिक तरुण, महिला, वृद्ध यांचे हॅकर्सने मोबाईल हॅक केले आहेत.

त्यांच्या मोबाईलमध्ये घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लील फोटो, पत्नी, आई, बहिण, मुलगी यांच्या विषयी अश्लील भाषेत मेसेज आले आहेत. यामुळे गावात संतप्त वातावरण झाले.

याची चौकशी करण्याची मागणी राजूर पोलिस स्टेशनकडे तरुणांनी केली आहे. याचे निवदेन माजी आमदार वैभव पिचड यांनाही देण्यात आले आहे.

अण्णासाहेब खाडगिर, बलवान उघडे, राजू खाड्गीर, सचिन गावंडे, भास्कर तातळे, भाऊसाहेब साबळे, दत्तू काठे, श्रावण काठे, वाळू धिंदले, गोरख काठे,

भरत काठे, विठ्ठल नाडेकर आदी ३५ तरुणांना व काही महिलांना वाईट व घाणेरडे मेसेज पाठवून संबधित हॅकर त्यांना चालेंज करत असून तुम्हाला कुठे जायचे तिथे जा माझे कुंनीच काही करू शकत नाही.

माझे ज्ञान मला वाचवू शकते, असा मेसेज करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटलं आहे. हा हॅकर कोण आहे याचा शोध सुरु असून

राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली असून सायबर क्राईमला तक्रार पाठविण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment