मोबाईल शॉपी फोडणाऱ्यास अखेर अटक !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- मोबाईल शॉपी फोडून घरफोडी करणार्‍या आरोपीला गजाआड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी योगेश काळु निरगुडे (रा. शिवडे, ता. सिन्नर, जि. नाशिक) व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला आहे.

याबाबतची फिर्याद संजय शिवनाथ शेळके (रा. देवठाण, ता. अकोले) यांनी दिली आहे. फिर्यादीवरून अकोले पोलिस स्टेशनला भादवी कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, योगेश काळु निरगुडे (वय 20, रा. शिवडे, ता. सिन्नर, जि. नाशिक) याने हा गुन्हा केला आहे.

आरोपी योगेश निरगुडे यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने आरोपी मयूर अशोक कातोरे, सोमनाथ कातोरे, अमोल भाऊराव भगत (सर्व रा. शिवडी, ता सिन्नर, जि. नाशिक) यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.

इतर सर्व आरोपी फरार आहेत. आरोपींनी मोबाईल शॉपी फोडून 29 हजार 590 रूपयांचा मुद्देमाल चोरला होता. आरोपींकडून 5 हजार रूपयांचा टेक्नो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!