अहमदनगर :- राजकारणामध्ये चढ – उतार चालू असतात. पक्षाने जरी मला लोकसभेची उमेदवारी दिली नाही,
माझे तिकीट कापले मात्र तरीही नाराज न होता, न थांबता पक्षाचेच काम करणार हे मी जाहीर केले आहे.

पक्षविरोधी कृती करणे आमच्या रक्तात नाही. २००४ मध्येही पक्षाने माझे तिकीट कापले होते, तरीही पक्षाचेच काम केले,
असे स्पष्टीकरण भाजपचे खासदार तथा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी शनिवारी दिले.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त शहर भाजपतर्फे लक्ष्मी कारंजा चौकातील कार्यालयात आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत मत की जय, वंदे मातरम्च्या जयघोषात या वेळी गांधींच्या हस्ते भाजप कार्यालयात गुढी उभारण्यात आली.
गांधी म्हणाले, कालपर्यंत काय झाले त्यावर आता चर्चा नको. आता उद्याच काय ते पाहू. दुसऱ्याने काय केले ते पाहण्यापेक्षा आपली रेष मोठी करू.
म्हणून न थांबता न थकता सर्वांनी पक्षाचे काम सुरू करायचे आहे. टीका टिप्पणीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
या वेळी ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष आसाराम ढूस, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, राजेंद्र विखे, सरचिटणीस किशोर बोरा, महिला बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, जगन्नाथ निंबाळकर, विवेक नाईक, अजित फुंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
- फक्त 500 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखोंचा परतावा! शून्य जोखमीसह हमखास परतावा देणाऱ्या टॉप 7 सरकारी स्कीम्स
- तुम्हाला Toppers सारखं यश हवंय? मग ‘हे’ अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत!
- मोठी बातमी ! ‘या’ महिलांचे लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये बंद होणार, मंत्री आदिती तटकरे यांची लेखी माहिती
- तब्बल 200 ते 250 वर्षांहूनही अधिक काळ जगतात कासव, नेमकं काय आहे त्यांच्या दीर्घायुष्याचं गुपित? वाचा!
- महाराष्ट्रात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती ! ‘ह्या’ महिन्यात निघणार 10 हजार पदांसाठीची जाहिरात