अहमदनगर Live24 :- खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मधील पोलीस आधीक्षक कार्यालयात अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. अखिलेशकुमार सिंह यांची भेट घेऊन जिल्ह्यातील लॉकडाउन आणि त्या दरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
तसेच शहरांतर्गत असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. कोरोनाच्या या महायुद्धात अहोरात्र लढणाऱ्या पोलीस बांधवाच्या व होम गार्डसच्या सुरक्षेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने चार हजार सॅनिटायझर बॉटल्स माननीय अधीक्षक यांच्याकडे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी सुपूर्द केल्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®