अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला अहमदनगर दक्षिण चे खासदार डॉ, सुजय विखे पाटील यांनी भेट दिली.
कोरोनच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी याठिकाणी करण्यात आलेल्या वैद्यकीय उपाययोजनांची तसेच इतर सर्व बाबींची पाहणी केली व आढावा घेतला.
अहमदनगर मधील नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन सुसज्ज असावे व त्याची खातरजमा करावी, अशी सूचना यावेळी उपस्थित डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकाऱ्यांना खा, डॉ, विखे पाटील यांनी केली.
तसेच या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता कोरोना चाचणी यंत्र आणण्यात आले असून, पुढील काही दिवसात अहमदनगरमध्ये देखील कोविड – १९ ची तपासणी करणे शक्य होणार आहे.
ज्यामुळे यापुढे चाचणी नमुने पुणे येथे पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही व वेळेची बचत होऊन त्वरित उपचार करण्यास मदत होईल.
अहमदनगरमधील नागरिकांच्या व वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने ही अतिशय दिलासादायक बाब असून, व्यवस्थापनाची पाहणी डॉ,विखे यांनी केली. याप्रसंगी सिव्हिल सर्जन डॉ. श्री. मुरंबीकर व इतर आरोग्य अधिकारी व मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com