खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा !

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- आदर्श आचारसंहिता लागू असल्याची माहिती असूनदेखील प्रचारफेरीसाठी विनापरवाना वाहन वापरणाऱ्या शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा एक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात भरारीपथक दोनचे प्रमुख कैलास पांडुरंग राऊत यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. लोखंडे शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. लोखंडे यांनी सोमवारी (१५ एप्रिल) संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, कोळवाडे, पिंपरणे, आंभोरे, डिग्रस, मालुंजे, जाखुरी आदी गावात चारचाकी वाहनातुन प्रचार फेरी काढली होती.

यात त्यांचे कार्यकर्तेदेखील सामील झाले. या प्रचारफेरीची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयातुन व्हायरल झाल्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी याची दखल घेत उमेदवार लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश भरारी पथक दोनचे प्रमुख कैलास राऊत यांना दिले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment