खासदार संजय राऊत म्हणाले अर्थसंकल्प देशाचा नसून भाजपाचा आहे

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- देशाचे लक्ष लागून राहिलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

आता या अर्थसंकल्पावरून अनेक सकरात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागली आहेत. यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे.

नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो.

परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रावर नेहमी अन्याय होत आलेला आहे. आकडे अर्थमंत्री देत आहेत.

त्यातले किती आकडे खरे आहेत किती खोटे आहेत हे सहा महिन्यात कळेल,” असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. काही राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्या राज्यांना निधी देण्याचा निर्णय घेतला असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा नसून राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प आहे असं म्हणाव लागेल, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी काही राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निधी देण्यात आला आहे का यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे मत व्यक्त केलं आहे.

अर्थसंकल्प कोणाचाही असला तरी सर्वसामान्यांना पोटाची आणि भूकेची भाषा कळते. तरुणांना बेरोजगारीची भाषा कळते. अशा काही सोप्या भाषेत अर्थसंकल्प मांडला तसेच त्यातून काही कृती झाली तर आम्हाला त्या अर्थसंकल्पाची पाठ थोपटता येईल,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment