अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : खासदार सुजय विखे पाटलांनी आज जामखेड चुंबळी गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जावून शेतकर्यांंशी संवाद साधला.यावेळी त्यांनी शेतात पेरणी करण्याचा आनंदही लुटला.
राज्यात अनेक ठिकाणी बोगस कृषी निविष्ठा मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली असून आधीच आसमानी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारच्या हलगर्जीपणामुळे सुलतानी संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे.
उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी याबाबत स्वतःहून सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली परंतु राज्य शासनाला आणि प्रशासनाला याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही,
यासारखे दुर्देव नाही याबाबत आपण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बोलून याबाबत पाठपुरावा करून बोगस कृषी निविष्ठा विकणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर
कारवाईसाठी भाग पडू असे प्रतिपादन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज जामखेड येथे केले
यावेळी त्यांच्या समवेत प स सभापती रवींद्र सुरवसे, जि प सद्स्य सोमनाथ पाचरणे, सुधीर राळेभात,भगवान मुरूमकर,प्रा अरुण वराट व शेतकरी बाळासाहेब काशिनाथ होलगुंडे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews