अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर – पुणे इंटरसिटी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी लोकसभेत केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांसंबधी लोकसभेत चर्चा सुरू आहे. त्या वेळी डॉ. विखे बोलत होते.नगर-पुणे रेल्वेचा प्रश्न मांडताना त्यांनी सांगितले की, ‘हे अंतर जरी कमी वाटत असले,
तरी वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, या मार्गावर रेल्वेसेवा सुरू केली पाहिजे. यासंबंधी लोकप्रतिनिधी म्हणून विविध संघटना आपल्याला या मागणीचे निवेदन देतात.
ही रेल्वेसेवा सुरू झाल्यास नगरचा पुण्याशी संपर्क सोपा होऊन उद्योग आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com