अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्य़ात झालेल्या वादळीवार्यांसह झालेला पाऊस, अतिवृष्टी आणि नैसर्गिक बदलांचा विपरीत परिणाम द्राक्ष आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्थिक नूकसान झाले होते.
याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून
दाखल केलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय स्तरावर मंजूरी मिळाल्याने जिल्ह्यातील १ हजार ५४६ फळबाग उत्पादक शेतक-यांना २ कोटी ७२ लाख रूपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
हवामानातील बदलांचा मोठा परिणाम फळबागांवर होतो. होणा-या नूकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकारने हवामानावर आधारीत पंतप्रधान फळ पीक विमा योजनेची सुरूवात करून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला.
जिल्हानिहाय शेतकऱ्यांना असा मिळणार लाभ जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यातील ३० शेतकऱ्यांना १४ लाख ४५ हजार, नगर तालुक्यातील ७४ शेतकऱ्यांना १० लाख ११ हजार, पारनेर मधील २७ शेतकऱ्यांना २लाख ७१ हजार,
पाथर्डी मधील १हजार १५ शेतकऱ्यांना ९२ लाख ६८ हजार, राहुरीतील एकमेव शेतकऱ्याला ४२ हजार ८४८ शेवगाव मधील ७८ शेतकऱ्यांना १२लाख ५५हजार श्रीगोंदा तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांना ४लाख ५१ हजार
राहाता तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांना ३७ लाख ७८ हजार संगमनेर तालुक्यातील ६९ शेतकऱ्यांना ६लाख १४ हजार,कोपरगाव तालुक्यातील ६३ शेतकऱ्यांना १०लाख ५५हजार
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ शेतकऱ्यांना ६लाख २५हजार,श्रीरामपूर तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना २ लाख ६४ हजार रूपयांचे विमा अनुदान मंजूर झाले आहे.
यामुळे अर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून उर्वरित प्रस्तावांचाही पाठपुरावा करून विमा रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.डॉ विखे यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved