अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मुंबई : सोमवारी वांद्रे पूर्व येथे मातोश्री परिसरातील चहाच्या टपरीवाल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याने यंत्रणांची झोप उडाली. त्यांनी या चहा टपरीवाल्याला रुग्णालयात दाखल केले असून, हा परिसर सील केला आहे.
मुंबईमध्ये पालिका प्रशासनाने कोरोनाबाधित क्षेत्र सील करून नागरिकांना या परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईतील ८ हॉटस्पॉट जाहीर केले असून, या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने कोरोनाचा संसर्ग गतीने वाढत असल्याबद्दल प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com