अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-देशभरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात जास्त रुग्णसंख्या आहे. मुंबईमध्ये कोरोनाने प्रचंड थैमान घातले असून धारावीत तर धक्कादायक टप्पा रुग्णसंख्येने ओलांडला आहे.
मुंबईतल्या रूग्णांच्या संख्येनं ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईत एक हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. दिवसाला २ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.
धारावीत आज नवीन ३६ रूग्ण पाॅझिटीव्ह आढळले. आतापर्यंत धारावीत १६७५ एकुण रू्गण पाॅझिटीव्ह आहेत. मुंबईत मागील सात दिवसांत कोरोनाची नवीन प्रकरणं दररोज सरासरी 5.17 टक्क्यांनी वाढत आहेत.
माहीम, धारावी आणि दादर परिसरात तब्बल 2,728 कोरोना रुग्ण आहेत. धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढतो आहे.
तर आर उत्तर म्हणजे दहिसर क्षेत्रात सर्वात कमी 309 कोरोना रुग्णांची नोंद आहे. मुंबईत एका चौरस किलोमीटरमध्ये 10 लाख लोकसंख्या आहे. न्यूयाॅर्कच्या मॅनहॅटनच्या तुलनेत 10 पट जास्त घनता आहे.
50 जणांमध्ये एक सार्वजनिक शौच्चालय आहेत. 10 फुटांच्या रूममध्ये 10 ते 12 लोकांचं वास्तव्य आहे. फिजिकल डिस्टन्स पाळणं अशक्य आहे.
त्यामुळे सरकार आणि प्रशासन चिंतेमध्ये पडलाय. मुंबईत 70 सार्वजनिक रूग्णालयं 20हजार 700 बेडची सार्वजनिक रूग्णालयांची क्षमता. मुंबईत 1 हजार 500 खासगी रुग्णालयं.
1हजार 500 बेडची खासगी रूग्णालयांची क्षमता आहे. म्हणजेच 3000 लोकांमागे 1 बेड. नियमांप्रमाणे 550 रूग्णांमागे 1 बेड असायला हवा.
राज्य सरकारकडून आपत्कालीन हॉस्पिटलची निर्मिती. नव्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि स्टाफची कमतरता आहे. लोकसंख्येच्या घनतेमुळेच संकट वाढल्याचं म्हटलं जातं.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com