अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे.
या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतं, परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली.

मात्र कृष्णा हेगडे यांना पहिल्यांदा आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनीच माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, हेगडेंनी केलेले आरोप माझी प्रतिमा मलीन करत धनंजय मुंडे यांच्यावरील गुन्ह्यात अडथळा आणणारे आहेत. कृष्णा हेगडेंचे आरोप बोगस आहेत असा दावा तक्रारदार महिलेने केला. त्यापाठोपाठ आता पुन्हा या प्रकरणात महिलेने तुमची हीच इच्छा असेल तर मी माघार घेते असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तक्रारदार महिलेने ट्विटमध्ये म्हटलं की, एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे. जर मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत?
मी मागे हटली तरी मला माझ्यावर गर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढतेय. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि हे लोक माझ्याविरोधात एकत्र आलेत, तुम्हाला जे हवं ते लिहा असं सांगत रेणु शर्माने देव तुमचं भलं करो असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved