अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीगोंदा तालुक्यातील साळवणदेवी रोड परिसरात राहणारा तरुण अक्षय कावऱ्या काळे याने संबंधित व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. या उसण्या पैशावरुन अक्षय काळे याचे पैसे देणारे काळे यांच्याबरोबर भांडण झाले.
त्यावरुन अक्षय काळे या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली होती. याचा राग मनात धरुन चौघा आरोपींनी काल रात्री ११.३० च्या सुमारास अक्षय कावऱ्या काळे व त्याची पत्नी सौ. काळे यांना लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण केली तर लहान मुलगा सूरज अक्षय काळे, वय ४ वर्ष ४ महिने याला काठीचे फटके मारले व जिवे ठार करुन खून केला.
याप्रकरणी अक्षय काळे या तरुणाने श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी लाल्या हसऱ्या काळे, शक्ती हसऱ्या काळे, काल्या हसऱ्या काळे, राधाबाई हसऱ्या काळे, सर्व रा. साळवणदेवी रोड, श्रीगोंदा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या खुनाच्या प्रकरणातील शक्ती काळे, काल्या काळे, व राधाबाई काळे यांना पोलिसांनी पकडले असून फरार लुल्या काळे याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. घटनास्थळी डिवायएसपी सातवे यांनी भेट दिली. सपोनि पाटील हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने श्रीगोंदा परिसरात खळबळ उडाली आहे.