बलात्काराच्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी,प्रेयसीला बळजबरीने राखी बांधायला लावून प्रियकराला केले आत्महत्येस प्रवृत्त.

Published on -

नागपूर : भाचीला तिच्या प्रियकराला राखी बांधण्यास मामीने जबरदस्ती करून तर मामाने बलात्काराच्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीची बहीण, तिची मामी आणि मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोपाल रामपाल वर्मा, असे मृतकाचेे नाव आहे. नंदनवन हद्दीतील हिवरीनगर, नागपूरयेथे राहणारा गोपाल रामपाल वर्मा (२१) त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मर्ग चौकशीअंती स्पष्ट झाले की, गोपाल वर्मा याचे ईिशका (१८) नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते आणि तो तिच्याशी लग्न करणार होता.

परंतु, ईिशकाची बहीण आरोपी याशिका राजेश अग्रवाल (२०, रा. बी १/११ व्यंकटेशनगर, नागपूर), आरोपी मामा विजय ईश्वरदास अग्रवाल (५१), मामी मिनू विजय अग्रवाल या तिघांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता.

गोपाल आणि ईिशका हे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि वर्गमित्र होते. . मामा, मामी आणि बहिणीने अनेकदा दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला. पण गोपाल काही एक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

एकेदिवशी मामा, मामी आणि बहिणीने संगनमत करून गोपालला गोडीगुलाबीने घरी बोलाविले आणि प्रेयसी ईिशकाच्या हातून प्रियकर गोपालच्या हाताला आरोपी मामी मिनू विजय अग्रवाल यांनी राखीचा धागा बांधून बहिणीचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नाही तर आरोपी मामा विजय ईश्वरदास अग्रवाल यांनी गोपालला बलात्काराच्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली.

या दोन्ही प्रकारामुळे मानसिकरित्या खचलेल्या गोपालने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी फिर्यादी राकेशपाल मुनेशप्रसाद वर्मा (३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe