नामदार प्राजक्त तनपुरे यांची माजी आमदार कर्डिले यांच्यावर नाव न घेता टीका म्हणाले ….

Ahmednagarlive24
Published:

राहुरी :- वांबोरी चारी योजनेअंतर्गत येर्णा­या राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ पाझर तलावात इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे ६८० एमसिप्टी पाणी यावर्षी आम्ही दिले असून, यापूर्वी कधीही एप्रिल महिन्यात वांबोरीचारीला पाणी सोडण्याचे काम झाले नाही.

मात्र एप्रिल महिन्यातही बोनस म्हणून काही दिवस वांबोरी चारीला पाणी सोडून राहुरीकर पाणी आडवणारे नसून पाणी देणारे आहेत. त्यामुळे उगाच सोशल मीडियाद्वारे विरोधकांनी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.

अशा स्पष्ट शब्दात राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी नामदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे पत्रकारांशी संवाद साधतांना ना.तनपुरे म्हणाले की, मागील दहा वर्षात निव्वळ वांबोरी चारीचे बटन दाबून फोटोसेशनचे काम करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र किती लाभधारक तलावात पाणी पोहोचले, याची कधीही माहिती घेतली नाही.

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करत राहिले. आम्ही मात्र या योजनेचा पूर्णपणे अभ्यास केला. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच योजनेवर काम करणारे कर्मचारी या सर्वांना विश्वासात घेऊन मढीपर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम केले.

दहा वर्षात पहिल्यांदा पूर्ण दाबाने शंभर दिवस ६८० एमसिप्टी पाणी उचलून लाभधारक तलावापर्यंत पोहोचवले. यापूर्वी देखील अनेक वेळा मुळा धरण ओव्हरफ्लो झाले, मात्र त्यावेळेस सत्येत असणाऱ्यांना का नाही शंभर दिवस ६८० एमसीप्टी पाणी वांबोरी चारीला देता आले.

इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात वांबोरी चारीला पाणी देऊन या शेतकऱ्यांमध्ये आम्ही एक विश्वास निर्माण केला. पाण्यासारख्या प्रश्नात राजकारण करण्याची माझी इच्छा नाही

मात्र कार्यकर्त्यांच्या आडून सोशल मीडियाद्वारे टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधक करत आहेत. तुमच्या नाकर्तेपणामुळेच या मतदारसंघातील जनतेने आम्हाला भरभरून मते देऊन, या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment