जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील…

Published on -

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

File Photo नवाब मलिक

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले.

जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

File Photo राधाकृष्ण विखे पाटील

१९९५ साली शिवसेनेच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते, नंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसकडे

आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडे वळले आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.

File Photo सुजय विखे यांचा भाजप प्रवेश

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा.डॉ सुजय विखे ज्यावेळी भाजपमध्ये गेले त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते.

Photo – राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला

चर्चेत राहण्यासाठी फक्त टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिला आहे, असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान लवकरच विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News